हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या खास अदांमुळे ओळखली जाते. देसी लूकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच बोल्ड लूक समोर आला आहे. सपनाचा हा नवा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीय पेहरावात ठुमके लगावत प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी सपना चौधरी कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.  कोणतंही अश्लिल नृत्य न करताही ती प्रेक्षकांची मनं जिंकते. मात्र सपना चौधरीचा वेगळाच लूक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतो आहे.



सपनानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण व्हाईट बोल्ड लूक सपनानं फ्लॉन्ट केला आहे.  व्हाईट ट्राऊझर, त्यावर व्हाईट जॅकेट सपनानं घातलंय मात्र जॅकेटची बटन खोलून चाहत्यांना बोल्ड शॉक दिला आहे.



व्हाईट लूकमध्ये सपनाने न्यूड मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत तसंच गळ्यात मंगळसूत्रही घातलं आहे.



'हिऱ्यासारखे चमका' असं कॅप्शन देत सपनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सपना चौधरीचा हा बोल्ड लूक सुद्धा तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे.