मुंबई : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते भाऊ कदम लवकरच 'नशीबवान' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर दाखल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. कथा - पटकथा - संवाद आणि सिनेमॅटोग्राफी या जबाबदाऱ्याही त्यांनीच पार पाडल्यात.


'नशीबवान'चा फर्स्ट लूक

गोळे यांची निर्मिती असलेल्या 'रंगा पतंगा' या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या 'हा भारत माझा'ला 'पिफ'मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आलंय. 
 
या चित्रपटाची ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (पिफ) च्या स्पर्धा विभागात निवड झालीय.