मुंबई : अडल्ट स्टार म्हणून ओळख निर्माण करणारी (Mia Khalifa) मिया खलिफा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. कायमच काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्या मियानं तिच्या फॉलोअर्सशी असणारं खास नातंही जपलं आहे. तिच्यावर जीव ओवाळून टाकणारेही अनेकजण आहेत. त्यापैकीच एका फॉलोअरनं मियासाठी जे काही केलंय ते पाहून तिचीसुद्धा झोप उडाली असावी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका टॅट्टू आर्टिस्टनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये तो पायावर कोरलेला मियाचा चेहरा सर्वांसमोर आणताना दिसत आहे. मियाचा हसरा चेहरा या टॅट्टूमध्ये असून, तिचा प्रसिद्ध चष्माही इथं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि थेट मियापर्यंत पोहोचला. 


मियानं जेव्हा हे सारंकाही पाहिलं, तेव्हा ती यावर व्यक्तही झाली. चाहत्यानं उचललेल्या या पावलावर तिनं फारसी आनंदी प्रतिक्रिया दिली नाही. काहीशा निराश मियानं मग तिच्या स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर करत हे भयानक असल्याची प्रतिक्रिया दिली. मियाची प्रतिक्रिया काय, हे पाहूनही तिच्या फॉलोअरनं मात्र आनंदात थँक्यू असं म्हणत भलतंच वेड दाखवलं. 



मियाच्या चष्म्याला मिळालेले लाखो रुपये... 
मिया वारंवार जो चष्मा वापरते आणि चाहत्याच्या टॅट्टूवरही जो चष्मा दिसत आहे त्याचा लिलाव करण्यात आला होता. बेरूत येथील पीडितांसाठी निधी जमवण्याच्या हेतूनं या चष्म्याचा लिलाव करण्यात आला होता. या चष्म्यावर 73 लाखांची बोली लागली होती.