PHOTO : चिरंजीवीसोबत अमिताभ अशा अवतारात दिसणार!
महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत `सई रा नरसिम्हा रेड्डी`मध्ये ते दिसणार आहेत.
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'सई रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते दिसणार आहेत.
चिरंजीवीसोबत काम करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय. या सिनेमात अमिताभ एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहेत.
त्यांनी आपल्या नव्या लूकसोबत फिल्म सेटवरचे काही फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत.
७५ वर्षीय अमिताभ हैदराबादमध्ये सिनेमाच्या शूटिंगसाठी आहेत. याचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी आणि निर्मिती रामचरण करत आहेत.
अमिताभ लवकरच अभिनेता ऋषि कपूर यांच्यासोबत '१०२ नॉट आऊट'मध्ये दिसणार आहेत.