मुंबई : साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोफेशनल लाईफप्रमाणेच साऊथ मधील अभिनेता विजय देवरकोंडा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमी चर्चेत असतो. लाखो मुली या अभिनेत्यावर फिदा आहेत मात्र त्याचं नाव रश्मिका मंदान्नासोबत जोडलं गेलं आहे. अनेक दिवसांपासून हे कपल एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. 


मात्र, रश्मिका आणि विजय नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे. पण आता दोघांशी संबंधित एका बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रश्मिका आणि विजयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघंही वधू आणि वर म्हणून पोज देताना दिसत आहेत. या फोटोवरुन दोघांनी लग्न केल्याचं दिसत आहे.


रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या अफवांदरम्यान, दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघंही एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. यादरम्यान रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आहे. हे पाहून दोघंही त्यांच्या लग्नामुळे खूप खूश असल्याचं दिसून येत आहे. विजय देवराकोंडा पांढऱ्या शेरवानी आणि पगडीमध्ये डॅशिंग दिसत आहे  तर दुसरीकडे मात्र रश्मिका सोनेरी रंगाच्या पोशाखात आहे खूलून दिसत आहे. दोघांच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर मात्र खळबळ उडाली आहे.


काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या या फोटोत काहीच तथ्य नाही. हा फोटो दोघांच्या फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो नीट पाहिल्यास एका चाहत्याने अभिनेत्याचे हे फोटो  मॉर्फ केले आहेत, हे या फोटोवरुन स्पष्टपणे दिसत आहे.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, विजय देवरकोंडा शेवटचा 'लिगर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसली होती. हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आला होता पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट  फ्लॉप झाला. त्याचबरोबर रश्मिकाने 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.