मुंबई : 'फुलपाखरू' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे. हृता दुर्गुळे 'फुलपाखरू' या मालिकेत 'वैदेही'ची भूमिका साकारत आहे. अवघ्या काही दिवसातंच हृताच्या फॅन्समध्ये प्रचंड वाढ झाली. कॉलेज गोईंग मुलांची ही प्रेमकहाणी अवघ्या छोट्याशा वेळेतच लोकप्रिय झाली. सध्या मालिके प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. त्यामुळे आवडत्या मालिकेतील आपले आवडते कलाकार नेमकं काय करतात हे प्रत्येक फॅन्सला जाणून घेण्याची इच्छा असते. तर आता आम्ही तुम्हाला तुमचे आवडीचे कलाकार वैदेही आणि मानस म्हणजे हृता दुर्गुळे आणि यशोमन नेमकं काय करत आहेत बघा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृता दुर्गुळे सध्या मालिकेच्या शुटींगमधून छोटासा ब्रेक घेतला आहे. हृता सध्या सिक्कीम गंगकोटला फिरायला गेली होती. तिथे भटकंती करत असताना हृताने काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतून हृता हा ब्रेक किती एन्जॉय करतेय. पाहा तिचे हे खास फोटो 






फुलपाखरू या मालिकेत सध्या मानस आणि वैदेही दोघंही आपल्या नव्या नोकरीच्या आनंदात आहे. झी युवावरील ही मालिका दिवसेंदिवस फुलत जात असून प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे.