नवी दिल्ली :  रविवारी देशभरात करवा चौथचा सण खूप उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमध्ये करवा चौथची धूम पाहायला मिळाली. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी करवा चौथचा व्रत ठेवल होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी पूजा पाठ करून आपला व्रत सोडला. नेहमी स्टार आपल्या घरी पूजा करतात पण यंदा अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांनी घरी या पूजेचा आयोजन केले होते. 


यावेळी त्यांच्या घऱी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. श्रीदेवी, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, नीलम कोठारी, संजय कपूरची पत्नी महीप संधू, चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. 




यावेळी वरूण धवनची आई आणि भावजयी जान्हवी पण उपस्थित होती. यावेळी हे फोटो सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर शेअर केले. 



शिल्पा शेट्टीने व्रत सोडल्यानंतर जेवताना आपला फोटो शेअर केला आहे. यात ती जेवणाची प्रशंसा करताना दिसत आहे.