मुंबई : शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गजांसोबत मोहबत्तें चित्रपटामध्ये काम केलेल्या उदय चोप्राचे फोटो समोर आले आहेत. उदय चोप्राचे हे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहबत्तें या चित्रपटामधून उदय चोप्रानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. याचबरोबर धूम चित्रपटाच्या दोन पार्ट्समध्येही उदय चोप्रा दिसला, पण यानंतर मात्र तो बॉलीवूड इंडस्ट्रीपासून लांब फेकला गेला.



(फोटो - बॉलीवूडलाइफ.कॉम)


बऱ्याच काळानंतर उदय चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उदय चोप्राचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये उदय चोप्राचं वजन वाढलेलं आणि केस पिकलेले पाहायला मिळत आहेत. 



(फोटो - बॉलीवूडलाइफ.कॉम)


उदय चोप्राचे हे फोटो बुधवारी काढण्यात आले आहेत. अभिनेता इम्रान हाशमीच्या घरातून बाहेर पडताना हे फोटो काढण्यात आले. बॉलीवूडमध्ये उदय चोप्रा फारसा यशस्वी झाला नसला तरी त्याच्या रिलेशनशिप्समुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. अभिनेत्री नरगीस फाकरीसोबत त्याच्या रिलेशनशिपच्या नेहमीच चर्चा झाली. 


(फोटो - बॉलीवूडलाइफ.कॉम)