Piyush Mishra Suno re Kissa: सोशल मीडिया आणि इंटरनेटवर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचे जुने दिवस डोळ्यासमोर येऊन जातात.  मनोज वाजपेयीचा एक फार जुना व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. या व्हिडीओतून त्यांच्या थिएटरमधील कामाच्या आठवणी ताज्या होत आहेत. 


मनोज वाजपेयींचा जुना व्हिडीओ व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ साधारण 33 वर्षे इतका जुना आहे.  त्यावेळी टेलिव्हीजन नुकताच घराघरात येऊ लागला होता. बहुतांश जणांकडे ब्लॅक अॅण्ड टीव्हीच होता. त्यावेळी दुरदर्शन हे चॅनल सगळीकडे पाहिले जायचे. दुरदर्शनवर देशभरातील सर्व प्रमुख बातम्या दाखवल्या जायच्या. त्यासोबतच मनोरंजनाचे काही कार्यक्रमही दाखवले जायचे. घराघरात लोक गर्दी करुन हे कार्यक्रम पाहायचे. त्यावेळी एक खूप चर्चेतला कार्यक्रम म्हणजे सुनो रे किस्सा.  1991 साली नाट्यमय कथा मालिकेतून दाखवली जायची. या मालिकेला मोठा प्रेक्षकवर्ग होता. आता या गोष्टीला 33 वर्षे झाली तरी याच्या आठवणी कोणी विसरु शकत नाही.  


पाहा व्हिडीओ



या मालिकेतील स्टारकास्ट आज मोठे कलाकार झाले आहेत. या कलाकारांनी आपल्या कर्तुत्वाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात आले असेलच. या क्लिपमध्ये पियुष मिश्रा, पौर्णिमा खर्गा आणि दिव्या सेठ शाह यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. प्रसार भारती अर्काइव्हजने हा शो सादर केलाय. आजचे प्रतिभावान कलाकार 25 वर्षांपूर्वी कसे दिसायचे,ते यातून पाहायला मिळतंय. 


चाहत्यांना झालाय आनंद 


व्हायरल होणाऱ्या या क्लिपमध्ये मनोज बाजपेयींच्या कामाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मनोज वाजपेयीच्या थिएटर ते बॉलीवूड या प्रवासाचे सारेजण कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर आलाय.  एका युजरने म्हटले, 'यार, या लोकांनी खूप लांबचा पल्ला गाठला आहे... त्यांनी केलेल्या कामासाठी ते सन्मानास पात्र आहेत.'


'हे आश्चर्यकारक होते! मला ते लहानपणापासून अजूनही आठवतय, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे. तर "सर्वोत्तम भाग म्हणजे सर्वांनी एकत्र काम केले आहे, अशी कमेंट एकाने केली आहे. 


जिंकलाय राष्ट्रीय पुरस्कार 


मनोज बाजपेयीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास प्रेरणादायी आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात थिएटरमधील कामातून केली. त्याने आपले कौशल्य ओळखले आणि आपल्या अभिनय क्षमतेचा पाया रचला. गेल्या काही वर्षांत तर त्याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. सध्याच्या घडीला तो बॉलीवूडमधील घराघरातील जवळचे नाव बनलाय. गुलमोहर या चित्रपटासाठी मनोज वाजपेयीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला होता आणि चाहत्यांचे आभारदेखील मानले होते. 
'मला खूप छान वाटतंय. कारण नॅशनल अवॉर्ड्ससारख्या ठिकाणी येऊन एवढ्या छोट्याशा चित्रपटातून आपली उपस्थिती ज्या प्रकारे जाणवते, ती आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते',असे तो यावेळी म्हणाला होता. 


मनोज वाजपेयी लवकरच त्याच्या लोकप्रिय वेब सीरिज फॅमिली मॅन 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा श्रीकांतच्या भूमिकेत दिसणार आहे.