Gemadpanthi web series : कोरोनानंतर प्रेक्षक टीव्हीवरील सिरियल आणि थिएटरमध्ये चित्रपट सोडून ओटीटीवरील सिरीजचा चस्का लागला आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येत ओटीटीवरील सिरीज पाहत असतात. हिंदीपासून मराठीमधील या सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. हिंदीतील अनेक दिग्गज कलाकारांपासून मराठीतील गाजलेले कलाकार या सिरीजमधून आपलं नशीब आजमावत आहेत. मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रानबाजार ही सिरीज तिच्या बोल्ड सीनमुळे तुफान गाजली होती. आता अजून एक बोल्ड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गेमाडपंथी' असं या सिरीजचं नाव असून याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील किसिंग सीन पाहून ही सिरीज एकट्यामध्ये पाहावी लागणार हे नक्की. मुख्य अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि अभिनेता प्रणव रावराणे यांचे अनेक बोल्ड सीन या सिरीजमध्ये पाहिला मिळणार आहे. ''बेगम, बादशाह, गुलाम आणि ...गेम'' एक प्रकारची बोल्ड कॉमेडी सिरीज आहे. (planet marathi new blod wed series gemadpanthi teaser out hot and black comedy)


पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे या कलाकारांसोबतच उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, दिगंबर नाईक, सविता मालपेकर हेही सुद्धा दिसणार आहेत. या सिरीजचं नाव ऐकून तुम्ही हैराण झाले असाल. तर आम्ही सांगतो हेमाडपंथी या साधर्म्य साधणारा हा शब्द 'गेमाडपंथी' आहे.  टीझरवरुन पूजा आपल्या अदाने अभिनेत्याला आपल्या प्रेम जाळ्यात ओढताना दिसतं आहे. तर त्याशिवाय हा टीझर पाहून असं दिसतंय की, कोणाचा तरी अपहरणाचा प्लॅन शिजताना दिसतं आहे.



लवकरच ही सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गेमाडपंथी' या सिरीजबद्दल प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, 'प्लॅनेट मराठीने आतापर्यंत वेगवेगळे विषयांवर सिरीज आणले आहेत. ही सिरीज कॅामेडीचा वेगळा जॉनर दाखविणारा ठरणार आहे. ही वेबसीरिज शहरी प्रेक्षकांसोबतच ग्रामीण प्रेक्षकांनाही आवडेल असा विश्वास बर्दापूरकर यांनी व्यक्त केला आहे.