Record: `गेम ऑफ थ्रोन्स`ला जगातील सर्वाधिक व्ह्यूअरशिप
`गेम ऑफ थ्रोन्स`वर २०१९ या वर्षांत जवळपास दहा कोटी ट्विट करण्यात आले आहेत.
मुंबई : 'गेम ऑफ थ्रोन्स'ने आणखी एका रेकॉर्डसह आपल्या सीरीजची समाप्ती केली आहे. या सीरीजच्या अंतिम भागातील शेवटच्या एपिसोडने अमेरिकेतील एचबीओच्या १.९३ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार करत रेकॉर्ड केला आहे. रिपोर्टनुसार, 'द आर्यन थ्रोन्स'ने गेल्या आठवड्यातील एपिसोड 'द बेल्स'द्वारा बनवण्यात आलेला रेकॉर्ड तोडला आहे. 'द बेल्स'ने १.८४ कोटी व्ह्यूवर्सचा आकडा पार केला होता.
'एचबीओ'ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १.३६ कोटी लोकांनी 'The Iron Throne'सीरीज एचबीओवर पाहिली. नेटवर्कच्या इतिहासात हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा टेलिकास्ट ठरला आहे.
दूरदर्शनच्या मानकांनुसार, 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या प्रेक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'द बिग बॅंग थेअरी'ची गेल्या आठवड्यात दाखवण्यात आलेली शेवटची सीरीज १.८ कोटी लोकांनी पाहिली होती.
'गेम ऑफ थ्रोन्स'वर २०१९ या वर्षांत जवळपास दहा कोटी ट्विट केले गेल्याची माहिती आहे. या सीरीजच्या फिनालेदरम्यान जॉन स्नो, ब्रॅन, ड्रॅगन आणि डेनेरेस या पात्रांसाठी सर्वाधिक ट्विट करण्यात आले.
'गेम ऑफ थ्रोन्स'चा गेल्या एका दशकापासून जगातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये समावेश करण्यात आला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या ८ सीजनमध्ये जवळपास ८३ एपिसोड प्रसारित करण्यात आले. १९ मे २०१९ रोजी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवटचा एपिसोड प्रसारित करण्यात आला.