मुंबई : अभिनेते अनुपम खेर स्टारर 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)  सिनेमाला सर्वचं स्तरातून उत्तम प्रतिक्रिया मिळत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. फक्त जनताचं नाही तर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाचं आणि सिनेमाच्या टीमची उत्तम कामासाठी पाठ थोपटली आहे. मोदी यांनी सिनेमाच्या टीमशी खास भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल यांनी मोदींसोबत काही फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करत ते म्हणाले, ' अभिषेकने भारतातील एक आव्हानात्मक सत्य समोर आणण्याची हिंमत दाखवली. त्यासाठी मला फार आनंद होत आहे...' 



तर दुसरीकडे सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी देखील पंतप्रधानांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा एक सुखद अनुभव होता. त्यांनी सिनेमाचं ज्या शब्दात कौतुक केलं, त्यामुळे काम करण्याची उर्जा आणखी वाढली आहे.'


''द कश्मीर फाइल्स' सिनेमा तयार करताना आता जो अनुभन आला तो यापूर्वी कधी आला नाही...' अशी भावना व्यक्त करत अभिषेक अग्रवाल यांनी मोदींचे आभार मानले आहेत. सध्या सर्वत्र 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाची चर्चा सुरू आहे.