PM Modi यांनी नाव न घेता केलं Pathaan चं कौतुक? शाहरुखच्या चाहत्यांनी केला...
Shahrukh Khan च्या Pathaan चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पार्लिमेंटमध्ये केले कौतुक. त्यांचा व्हिडीओ समोर येताच शाहरुखच्या चाहत्यांमध्येच एकच खळबळ, पाहा व्हिडीओ
PM Modi On Shahrukh Khan's Pathaan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण'नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. पठाणच्या कमाईचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर तर प्रेक्षकांनी पठाणचे थिएटरमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कौतुक केले आहे. दरम्यान, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखच्या चाहत्यांनी असा दावा केला आहे की प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पठाणचे कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शाहरुखच्या फेनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कश्मिरमधील चित्रपटगृह हे हाऊसफुल असण्यावर बोलताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात की त्यावेळी लोक टीव्हीवर चमकण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी श्रीनगरमध्ये दशकांनंतर थिएटर्स हाऊसफुल होतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यातील 'श्रीनगरमध्ये दशकांनंतर थिएटर्स हाऊसफुल होतायत.' हे वक्तव्य शाहरुखच्या चाहत्याला आवडलं आणि त्यांनी मग फॅन पेजवर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता शाहरुखचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. शाहरुखच्या चाहत्यांचे एकच म्हणणे आहे की पंतप्रधान मोदी हे फक्त पठाण विषयीच बोलत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांनी चित्रपटांवर बोलणं टाळायला हवं, असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोणत्याही अभिनेत्याचं किंवा चित्रपटाचं नाव घेतलं नव्हतं. तर भाजपच्या काही नेत्यांनी 'पठाण'च्या बेशरम गाण्यावर आक्षेप घेतला होता.
हेही वाचा : जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता 'ती' अडकली ED च्या जाळ्यात
पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी सांगायचे झाले तर आज पठाणनं बॉक्स ऑफिसवर 875 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट 1 हजार कोटींचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल असे सगळ्यांचे मत आहे. शाहरुखचा पठाण हा चित्रपट सगळ्यात आधी बेशरम रंग या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. प्रदर्शनाआधी त्याला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणे त्याची साथ दिली त्यावरून आता चित्रपट लवकरच 1 हजार कोटीच्या क्लबमध्ये शामिल होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमनं मुख्य भूमिका साकारली आहे.