मुंबई : मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 'पीएम मोदी' चित्रपटाचा मार्ग मोकळा केला होता.आता निवडणूक आयोगाने सुध्दा चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. 'पीएम मोदी' ११ एप्रिल़ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने पण चित्रपटाला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उद्या रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झल्यानंतर विरोधी पक्षांकडून चित्रपटला विरोध करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पीएम मोदी' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व याचिका फेटाळण्यात आल्या नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपावली गेली होती. निवडणुकीच्या काळात आचार संहिता उल्लंघन होतयं की नाही, या विषयाला निवडणूक आयोगाने अखेर पूर्णविराम दिला आहे.   


सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार रूपेरी पद्यावर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांनी केले आहे.