VIDEO : `सौगंध मुझे इस मिट्टी की`... `पीएम नरेंद्र मोदी` चित्रपटातील गाणं प्रदर्शित
गाण्यामध्ये धरती मातेने माझं कर्ज कधी फेडणार असे विचारले आहे.
मुंबई : 'मेरी धरती मुझसे पुछ रही...' या ओळीने सुरू झालेल्या गाण्यात भारत माता आणि जनतेचा संवाद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्यामध्ये धरती मातेने माझं कर्ज कधी फेडणार असे विचारले आहे. देशाच्या ग्रमीण भागातील लोक कशा प्रकारे मातीत आपला घाम गाळतात गाण्याच्या माध्यामातून साकारण्यात आले आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की ये देश नहीं झुकने दूंगा' असे नाव असलेल्या गाण्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी देशवासियांच्या सुरक्षेची शपथ घेतली आहे. 'सौगंध मुझे इस मिट्टी की' हे गाणं गायक सुखविंदर सिंह आणि शशि सुमन यांच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आले आहे. तर देशभक्तीवर आधारित या गाण्याला शशि-खुशी यांनी संगीत दिले. प्रसून जोशी यांनी गाण्याचे लेखण केले असून मेघदीप बोस यांनी गाण्याची निर्मिती केली.
चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारत आहेत तर त्यांच्या वडीलांच्या भूमिकेत मजोज जोशी दिसणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता आणि अक्षत आर सलूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
राष्ट्रीय पुकस्कार विजेते ओमंग कुमार द्वारा दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती संदीप एससिंह, सुरेश आणि आनंद पंडित यांची आहे. चित्रपटाच्या कथेचे लेखण संदीप यांचे असून चित्रपट 5 एप्रिल रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.