पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची शूटिंग सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची सुरूवात अहमदाबादमध्ये झाली.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशोगाथा सांगणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारलेल्या या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका अभिनेता विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. सिनेमाच्या शूटिंगला प्रारंभ झाला. अहमदाबादमध्ये शूटिंगचे नारळ फोडण्यात आले. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर सिनेमाच्या पहिल्या दिवसाचे फोटो शेअर केले.फोटो मध्ये विवेक ओबेरॉय आणि ओमंग कुमार सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
फोटो शेअर करत तकण आदर्श म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची सुरूवात अहमदाबादमध्ये झाली. अहमदाबादशिवाय सिनेमाची शूटिंग गुजरात आणि इतर भागात होणार आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत विवेक ऑबेरॉय झळकणार असून बोमन ईरानी आणि दर्शन कुमार दिसणार आहेत. सिनेमाची निर्मिती सुरेश ऑबेरॉय आणि संदीप एस सिंह करणार असून सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करणार आहे.
मागील 2 वर्षांपासून सिनेमाची तयारी सुरू आहे. सिनेमात सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार होते. पण सिनेमात विवेक ऑबेरॉयची वर्णी लागली.