आता प्रियंका चोप्रानेही लावला नीरव मोदीवर फसवणुकीचा आरोप
देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकेच्या ११,४०० कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच नीरव मोदी देश सोडून पळाल्याचं बोललं जात आहे.
प्रियंकाला फसवले
सूत्रांनी दावा केलाय की, नीरव मोदी स्वित्झर्लॅंडमध्ये आहे. अशात नीरव मोदीच्या हि-याच्या कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर राहिलेल्या प्रियंका चोप्राने त्याच्या विरूद्ध फसवणुकीची तक्रार केल्याचे उघड झाले आहे.
काय केले प्रियंकासोबत?
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री प्रियंकाच्या मॅनेसजमेंट टीमने आरोप केलाय की, नीरवने त्याच्या जाहीरातींसाठी जितके पैसे देण्याचे कबूल केले होते, तितके पैसे दिले नाही. हि-यांच्या या जाहीरातींमध्ये प्रियंका चोप्रासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा दिसला होता.
बॅंकाच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकच्या मुंबईच्या शाखेतील १० हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ही रक्कम मुंबईतील एका शाखेतून घोळ करून अनधिकृतपणे देवाण-घेवाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या देवाण-घेवाणीतून काही ठराविक खातेदारांनाच फायदा पोहोचवला जात होता. हे प्रकरण पुढे येताच बॅकिंग क्षेत्रात एकच धमाका झाला आहे.
मुंबईत छापेमारीचे सत्र
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने सुरू केलेल्या कारवाईट मुंबई, गुजरात आणि दिल्लीत कमीत कमी १० जागांवर छापेमारी केलीये. यात मोदीच्या मुंबईच्या कुर्ला परिसरातील घर, काला घोडा परिसरातील डिझायनर ज्वेलरी दुकान, बांद्रा आणि लोअर परेलच्या कंपनीच्या तीन जागा तसेच गुजरात आणि दिल्लीतही काही ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत.
नीरव मोदीचं सेलिब्रिटी कनेक्शन
वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या ब्रँडची भुरळ अगदी हॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनाही पडली होती. हॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्री केट विन्सलेट, डकोता जॉन्सन, ताराजी हेन्सन यांनी नीरव मोदी ब्रँड अँबॅसिडर म्हणून जाहिराती आणि प्रचार, प्रसार केला. निरव मोदी ब्रँडचे दागिने घालून त्या रेड कार्पेटवर मिरवल्या. गेल्यावर्षी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही त्यांनी ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडलं होतं. २०१५ मध्ये मोदीनं न्यूयॉर्कमध्ये आपला शोरूम सुरू केला, तेव्हा त्याच्या उद्घाटनाला हॉलिवूड अभिनेत्री नवोमी वॅट्स, निमरत कौर, लिसा हेडन आणि मॉडेल कोको रोचा यांनी हजेरी लावली होती.