Dev Kolhi Passed Away: ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे आज सकाळी (शनिवार, 26 ऑगस्ट) रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहे. 100 हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतकार म्हणून काम पाहिले आहे. 'मैंने प्यार किया', 'बाजीगर', 'जुडवा', 'मुसाफिर', 'शुटआऊट एट लोखंडवाला', 'टॅक्सी नंबर 911' अशा मोठ्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होती. देव कोहली यांनी राम लक्ष्मण अन्नु मल्लिक, आनंद राज आनंद आणि आनंद मिलिंद अशा अनेक ख्यातनाम संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचे पार्थिव आज 2 नंतर त्यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ओशिवारा स्माशनभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आनंद राज आनंद, अनु मल्लिक, उत्तम सिंग आदी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी येणार आहेत.  देव कोहली यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1942 रोजी झाला. त्यांचे बालपण हे देहरादून येथे झाले आणि मग ते 1949 साली दिल्लीला आले होते. त्यांनी कंगना राणावत हिच्या Rajjo या चित्रपटासाठीही त्यांनी गाणी लिहिली होती. या गाण्यांचे संगीत हे उत्तम सिंग यांनी दिले होते. याशिवाय त्यांनी 'ये काली काली आखें', 'माये नी माये', 'आता जाते हसते गाते' अशी काही लोकप्रिय गाणी लिहिली आहेत. 


देव कोहली यांचे प्रवक्ते प्रीतम शर्मा यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त माध्यमांना दिले. आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी काही महिन्यांपुर्वी कोकिलाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना दहा दिवसांपुर्वीच घरी आणण्यात आले होते. कोहली यांचे जवळचे मित्र आणि संगीत दिग्दर्शक आनंद राज आनंद यांनी एएनआयला दिलेल्या बाईटमध्ये सांगितले की, ''1995 साली जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो तेव्हा मला माझं पहिलं काम मिळालं होतं. मला बॅंकेत अकांऊट काढायचे होते परंतु मला तर करता येणं हे शक्य नव्हतं. तेव्हा मला सरदारजी यांनीच मदत केली. ते मला म्हणाले की तुम्ही संगीत क्षेत्रात आहात आणि मी गाणी लिहितो. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत काम करायला सुरूवात केली.''


ते पुढे म्हणाले की, ''त्यांनी मला राधा कृष्ण' साठी एक गाणं संगीतबद्ध करायला सांगितले होते. त्यावेळी मी हे गाणं केलं आणि चक्क मला यानंतर प्रचंड यश प्राप्त झाले होते.'' 1964 पासून देव कोहली यांनी त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली. 1969 साली आलेला 'गुंडा' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यांचे पहिले गाणं 'गीत गाता हूॅं मैं', 'लाल पत्थर' या चित्रपटातील या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय त्यांनी 'कबूतर जा जा जा', 'गम आपके हैं कौन' अशी गाणीही लिहिली आहेत.