मुंबई :संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतात देखील कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा आता  ५३७ वर पोहचला. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधीक आहे. त्यामुळे राज्य सरकार पुढे हे मोठे आव्हान आसल्याचं दिसून येत आहे. या धोकादायक विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आहे. मोठ्या धैर्याने आणि संयमाने परिस्थिती हाताळत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. ट्विटरवर पोस्ट करत ते म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाबाबत स्पष्ट निर्देश देत आहेत, ते कौतुकास पात्र आहे. माझा सलाम.' 


जावेद अख्तर नेहमीच आपल्या परखड वक्तव्याबाबत ओळखले जातात.  कोरोना व्हायरसमुळे सरकारने सर्व कार्यक्रमांवर त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांवर बंदी आणली होती. तरी देखील अनेक ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण सुरू असल्यावरुन टीका केली होती आणि मशिदी बंद करण्याची मागणी देखील केली होती.