नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती एका दुचाकीवर बसलेली दिसत होती. मुख्य म्हणजे त्यावेळी साराने हेल्मेट घातलेलं नव्हतं. दिल्ली पोलिसांनी त्याच व्हिडिओची दखल घेतली असल्याची माहिती आता समोर येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



सारा अली खान आगामी येणारा चित्रपट ‘लव आजकल २’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका दृष्याच्या चित्रिकरणावेळी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दुचाकीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. साराने त्यावेळी हेल्मेट न घातल्याची बाब नेटकऱ्यांनीही उचलून धरली होती. किंबहुना याच व्हिडिओमुळे तिला ट्रोलही केलं गेलं होतं.  सेलिब्रिटी असून वाहतूक सुरक्षेचे नियम पाळणं हा बेजबाबदारपणा आहे.


‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, साराचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी सारा विरोधात तक्रार दाखल करून घेतली. पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून कधीही सारावर कारवाई करू केली जाऊ शकते असं तिला नोटीस देत बजवण्यात आलं आहे. कार्तिक आणि सारा ‘लव आजकल २’ या चित्रपटात एकत्र काम करत आहे. या व्हिडिओचे दृष्य चित्रिकरण दिल्लीत केल्या गेलं होतं. 


 


साराच्या आगामी चित्रपटाविषयी थोडं....  


'लव आजकल २' हा इम्तियाज अली दिग्दर्शित हा २००९ साली दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव आजकल’ या चित्रपटाच सिक्वल आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफवर पुष्कळ कमाई केला होती. ‘लव आजकल २’ या चित्रपटात सारा कार्तिक बरोबर रणदीप हुड्डासुद्धा पद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि पंजाबमध्ये होणार आहे. आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.