या दोघांनी उचलला नव्हता सुशांतचा शेवटचा कॉल, पोलीस करणार चौकशी
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस करणार या लोकांची चौकशी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेत्याच्या मोबाइल रेकॉर्डनुसार, त्याने शेवटचा कॉल रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांना केला होा. पण दोघांनी सुशांतचा फोन उचलला नव्हता. आता या प्रकरणात पोलीस दोघांची चौकशी करणार असल्याचं कळतं आहे.
सुशांतने 13 जून रोजी रात्री 12 नंतर रिया चक्रवर्ती आणि महेश शेट्टी यांना फोन केला होता. पण दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.
14 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता सुशांतसिंग राजपूत उठला. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता तो बहिणीशी फोनवर बोलला. साडेदहाच्या सुमारास सुशांत खोलीतून बाहेर पडला आणि ज्यूस घेतल्यानंतर परत रूममध्ये गेला. काही वेळाने जेव्हा नोकर दुपारच्या जेवणाबाबत विचारण्यासाठी गेला तेव्हा दार आतून बंद होतं. सुशांत दार उघडत नव्हता. एकत्र राहणाऱ्या मित्राने आणि नोकरांनी सुशांतला फोन केला पण त्याने फोन उचलला गेला नाही. यानंतर सर्वजण घाबरले.
संबंधित बातम्या: हे अपूर्ण चित्रपट मागे सोडून कायमचा निघून गेला सुशांत सिंह राजपूत
जेव्हा सुशांतने खोली उघडली नाही तेव्हा किल्ली बनविणार्याला बोलविले गेले. त्याने दार उघडलं पण खोलीत फॅनला सुशांतचा मृतदेह लटकलेला पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु पोलिसांना सुशांतच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट किंवा इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. रिया आणि महेश व्यतिरिक्त पोलीस सुशांतच्या इतर काही मित्रांचीही चौकशी करतील. त्याच वेळी, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सुशांतचा मृत्यू फाशी लागून गुदमरल्यामुळे झाला असल्याचं समोर आलं आहे.
रिया चक्रवर्ती ही एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सुशांतसोबत तिच्या अफेअरचीही चर्चा होती. दोघेही काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेले होते. त्याचबरोबर महेश शेट्टीने सुशांतबरोबर पवित्र रिश्ता मालिकेत काम केले आहे. तो सुशांतचा को-अॅक्टर आणि मित्रही होता.
अधिक वाचा: सुशांत सिंह राजपूतचे आत्महत्येपूर्वीचे 'ते' २४ तास