मुंबई : अभिनेत्री माधुरी दिक्षित लवकरच पंचक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ५ जानेवारीला रिलीज होणार आहे. या निमीत्ताने माधुरी यांनी नुकतीच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकारणाविषयी मोठा खुलासा केला आहे. झी २४ तासच्या  'लिडर्स' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आमचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी माधुरी यांना राजकारणाविषयी प्रश्न विचारला. अनेकदा माधूरी यांची राजकारणाच्या प्रवेशाविषयी चर्चा असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच माधुरी आणि श्रीराम नेनें यांनी 'झी 24 तास'च्या 'लीडर्स' या कार्यक्रमात हजेरी लावली. ''मध्य़े अचानक चर्चा होत्या. की, माधुरी फिल्म इंडस्ट्रीत पॉप्युलर आहे. तिने आता नवीन प्रोडक्शन केलंय. साहाजिक आहे इतकी प्रसिद्धी असल्यानंतर मग राजकारणी खासदार व्हा निवडणुकीला उभे राहा. राजकारणात यायचा विचार आहे का?'' यावर माधुरी यांनी उत्तर देत सांगितलं की, ''नाही अजिबात नाही. दर इलेक्शनच्या आधी मला, कुठे तरी उभं करतात ती लोकं इलेक्शनसाठी पण नाही. कारण मला नाही वाटत. its my cup of tea.'' यानंतर श्रीराम नेनें म्हणतात, ''शेवटी आपल्या सर्वांनाच न्यूट्रल वाटतं. काय आहे ना कोणीही चांगलं काम केलं की तर त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ना. पण आम्हाला त्याचात शिरायचंच  नाहीये.''  माधूरी दिक्षीत आणि श्रीराम नेनें निर्मीत पंचक हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.  जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.