मुंबई : पदार्पणानंतर पूजा बेदीची मुलगी अलिया सतत चर्चेत आहे. ती दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच ती तंदुरुस्त आहे. आज कोट्यावधी मुलींना तिच्या सारखी फिगर बनवण्याची इच्छा आहे. मात्र हे सोपं नाही कारण, अलिया स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया रोज वर्कआउट आणि योगा करते. ती तिच्या फिटनेसचे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत वारंवार शेअर करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया तिच्या बऱ्याच इंस्टाग्राम व्हिडिओंमध्ये योगा करताना दिसली आहे, ज्यात ती कधीकधी चक्रासन, पर्वतासन आणि कधी अर्धा मत्स्येंद्रसन सारख्या अनेक अवघड योगांची मुद्रा करताना दिसते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हँडस्टँड देखील ती करते. बरं, योगासनं तिच्या फिटनेसचं एकमेव रहस्य नाही. ती उर्वरित व्यायाम देखील मनापासून करते. बरं, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तिला घरी वर्कआऊट करायला आवडत नाही, पण आता मात्र आलिया कोविडमुळे घरीच व्यायाम करते.



नितीन कक्कर यांच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटातून अलायाने 2020मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सैफ अली खानने तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती आणि तब्बूने तिच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसली तरी लोकांना अल्याचा अभिनय आवडला..