नवी दिल्ली : चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट आज ६९ वर्षांचे झाले. महेश भट्ट यांचा जन्म २० सप्टेंबर १९४८ मध्ये झाला. १९७४ सालापासून 'मंजिलें और भी हैं' या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शनास सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सारांश' (१९८४) हा चित्रपट मॉस्को अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये  दाखवण्यात आला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कथालेखनासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ कथेचा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला. भाऊ मुकेश भट्ट यांच्यासोबत 'कब्जा' (१९८८) या चित्रपटाद्वारे ते चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार दशके ते चित्रपटसृष्टीत आपले घट्ट पाय रोवून आहेत. 'अर्थ', 'सारांश', 'डैडी', 'आवारगी' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून आपले असामान्य काम त्यांनी जगाला दाखवून दिले. महेश भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुली चित्रपट निर्माती पूजा आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.