Alcoholic बोलल्यावर भडकली पूजा भट्ट ; टोलर्सला दिले सडतोड उत्तर
सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे पूजा भट्ट.
मुंबई : सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे पूजा भट्ट. महेश भट्टची मोठी मुलगी, मॉडल आणि त्याचबरोबर व्हाईस आर्टिस्ट इंडस्ट्रीमध्ये तिने आपली चांगली ओळख बनवली. अलिकडेच पूजाने अमिताभ बच्चनने केलेल्या एका ट्वीटवर आपले मत दिले आहे. अमिताभ बच्चन यांनी कठुआ आणि उन्नाववर झालेल्या गॅँगरेपवर ट्विट केले होते. त्यावर उत्तर देताना पूजाने आपले मतही मांडले. मात्र तिला हे ट्वीट खूप भारी पडले. पूजाच्या या ट्वीटवर युजर्सने तिला चांगलेच ट्रोल केले. काही युजर्सने तिला अल्कोहोलीक म्हटले. त्यानंतर ट्रोलर्सवर पूजा चांगलीच भडकली. एका ट्रोलरने लिहिले, सीजनल किडा आणि एक अल्कोहोलीक आता अमिताभ बच्चनच्या नावावर प्रसिद्धी मिळवू इच्छिते.
पूजाने दिले सडतोड उत्तर
याचे उत्तर देताना पूजाने लिहिले की, दारूच्या व्यसनातून बाहेर पडल्याने मला स्वतःचा अभिमान आहे. या देशात तर लोकांना माहितही नाही पडत की त्यांना पिण्याचे व्यसन आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी गर्दीपेक्षा वेगळी आहे.
त्यातून ती बाहेर पडली
२०१६ मध्ये पूजाने दारुच्या व्यसनात बुडालेल्या स्वतःची संघर्षमय कथा सांगितली. तिने दारुचे व्यसन कधीच सोडले आहे. पण अजूनही पूजाची जूनी इमेज लोकांच्या मनातून गेलेली नाही.
या प्रश्नामुळे झाली ट्रोल
उन्वा आणि कठुआ प्रकरणावर अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, मला या सगळ्याची किव येते. त्यावर पूजा भट्टने ट्विट केले की, मी पिंकसारख्या सिनेमाची आठवण करुन देण्यास मदत नाही करु शकत. पण मोठ्या पडद्यावर दिसणारी इमेज प्रत्यक्षात नाही आणता येणार का? तिच्या या प्रश्नावर ट्रोलर्सने तिला चांगलेच ट्रोल केले.