मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे कायम चर्चेस असतात, त्यापैकी एक म्हणजे, दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट यांचा किस करताना फोटो. वयाची पन्नाशी गाठणारी हीच पूजा एकेकाळी तरुणांच्या काळजात घर करुन होती. रुपेरी पडद्यासोबतच ती चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलं ते म्हणजे आणखी एक कारण. तिचं खासगी आयुष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच 'बॉम्बे बेगम्स'  या सीरिजमधून पूजा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. निमित्त नवं होतं, पण चर्चेत आल्यांतर काही जुन्या गोष्टींनाच पुन्हा वाव मिळाली. पूजा आणि तिचे दिग्दर्शक वडील महेश भट्ट यांच्या नात्याची सर्वांना माहिती. 


खुद्द पूजानं अभिनयानंतर वडिलांच्या साथीनं दिग्दर्शनातही पाऊल टाकलं. पण, हे नातं तेव्हा धक्का देऊन गेलं जेव्हा महेश भट्ट यांनी स्वत:च्याच लेकिशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. 



एका मासिकासाठी महेश आणि पूजा भट्ट यांनी बोल्ड फोटोशूट केलं. यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पूजाच्या सौंदर्यावर महेश भट्ट इतके भाळले की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती. 



दरम्यान एका  मुलाखतीत, पूजाने वडिलांबाबत एक मोठ्या गोष्टीचा खुलासा केला, पूजा म्हणाली, 'महेश भट्ट कायम नशेत घरी यायचे आणि गैरवर्तन करायचे.. त्यामुळे माझी आई त्यांना बालकनीमध्ये बंद करून ठेवायची...'