Pooja Bhatt : बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी 1970 मध्ये किरण भट्ट यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं असून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी त्यांची नावं आहेत. त्यानंतर महेश भट्ट यांनी 1986 मध्ये सोनी राझदान यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांना देखील दोन मुलं असून आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट अशी त्यांची नाव आहेत. सध्या त्यांची मोठी लेक पूजा ही चर्चेचा विषय ठरत आहे. तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. त्यानंतर आता पूजानं वडील महेश भट्ट यांच्याविषयी काहीही बोलणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर पूजाला तिच्या वडिलांच्या आणि परवीन बाबी यांच्याविषयी 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या अफेरच्या चर्चांमुळे ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरून आता पूजानं या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. पूजाला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'अंधाऱ्या रात्री तुझ्या वडिलांच्या मागे निर्वस्त्र होऊन धावच असलेल्या परवीन बाबी यांचे किस्से सांगत आहेत. तुला खात्री आहे का की महेश भट्ट यांनी त्यांच्या अहंकारासाठी तुझ्या शरीराचा वापर केला नाही. काय विडंबना आहे देवा ही. लोक त्यांच्या अहंकार आणि पराक्रमांना संतुष्ट करण्यासाठी एखाद्याच्या निष्पाप भावनांचा वापर करू शकतात आणि मग स्वतःला देवाचे पुत्र म्हणवून मोकळेपणाने फिरतात.'



या ट्रोलिंगवर उत्तर देत पूजानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत पूजा म्हणाली की 'देवाचा आशीर्वाद तुझ्यावर कायम असू देत आणि तुमचा या द्वेशाच्या अंधारापासून सुटका मिळू देत. तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी होओत ही आशा करते.' 



हेही वाचा : नातवाचे फोटो पाठवल्यानं त्यांनी ब्लॉक केलं कारण...; गश्मीरचा वडिलांबद्दल धक्कादायक खुलासा


नेटकरी इथेच थांबले नाही तर त्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत पूजा आणि महेश भट्ट यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. पूजा भट्ट विषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसली होती. त्या कार्यक्रमात तिला पाहून अनेकांना आश्चर्य झाले होते. तर अनेकांनी तिला ट्रोलही केले होते. पूजाकडे बाथरूमचा एरियावर लक्ष ठेवण्याची आणि साफ सफाई ठेवण्याची जबाबदारी होती. त्यावरून शाहरुखनं तिची स्तुती देखील केली होती.