मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. तिच्यासोबत फ्लाईटमधील एअरलाइन्स कर्मचारी अतिशय असभ्य आणि धमकीच्या पद्धतीने बोलत होते. खुद्द पूजा हेगडेने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पूजाने ट्विट करताच ते खूप व्हायरल होऊ लागलय. ज्याच्या दबावाखाली विमान कंपनीला माफी मागावी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा हेगडेने ट्विट केलं आहे की, "विपुल नक्षे या एअरलाइन्स इंडिगोचा स्टाफ मेंबर याने मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये आमच्याशी गैरवर्तन केलं याचं मला खूप दुःख झालं आहे. विनाकारण माझ्याशी अज्ञानी, गर्विष्ठ आणि धमकावलेल्या पद्धतीने तो बोलत होता." या ट्विटमध्ये पूजाने असंही सांगितलं की, मी सहसा असे ट्विट करत नाही पण ते खरोखरच भयानक होतं.


अभिनेत्री पूजा हेगडेचं ट्विट लगेजच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यानंतर इंडिगोने तत्काळ कारवाई करत ट्विट करून माफी मागितली. तसंच आपलं तपशील शेअर करण्याचं आवाहन केलं. जेणेकरून त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती मिळू शकेल.



याशिवाय पूजा हेगडेच्या ट्विटला रिट्विट करत अनेकांनीही आपली मतंही मांडली. असे अनेक लोकं पुढे आले ज्यांनी एअरलाइनच्या काही भूतकाळातील घटनांचा उल्लेख केला. यापूर्वीही असंच काहीसं घडलं आहे. असं एका व्यक्तीने लिहिलं आहे. याशिवाय काही लोकांनी पूजा हेगडेला असा सल्लाही दिला की, तिने असं ट्विट करू नये. कारण तिच्या या ट्विटनंतर इंडिगो एअरलाइन त्या व्यक्तीकडून नोकरीवरुन काढून टाकेल.