पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा
Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या सोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सिद्धेश चव्हाणबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पूजा सावंतने उद्योगपती सिद्देश चव्हाणशी साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचा हा सोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला. या साखरपुड्याला जवळचे मित्र मंडळी आणि काही मोजक्याच कुटुंबियांना बोलावण्यात आले होते. (फोटो सौजन्य - BN entertainment suraj marathi)
अशी सजली पूजा
पूजाने साखरपुड्याला आधी हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. त्यावर नाकात नथ, गळ्यात हार, अतिशय साधा आणि सिंपल असा मेकअप, शोभून दिसणारी ज्वेलरी असा लूक केला होता. या लूकमध्ये पूजा अतिशय ग्लॅमरस दिसत होती. त्यानंतर तिने पांढऱ्या रंगाचा लेहंग घातला होता. तिचा पती सिद्धेशने देखील तिला मॅचिंक लूक केला होता. दोघेही एकदम क्यूट अंदाजात दिसत होते.
असा होता पूजाचा लूक
सोहळ्याला खास उपस्थिती
पूजा आणि सिद्धेश यांच्या साखरपुड्याला भूषण प्रधान, प्रर्थना बेहरे, वैभव तत्ववादी यांनी हजेरी लावली. तसेच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या अगदी जवळचे नातेवाईक या साखरपुड्याच्या सोहळ्याला उपस्थित होते.
पूजाचा जोडीदार
पूजा सावंतने जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा सावंतचा होणाऱ्या पतीचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. पूजा सावंतचा होणारा पती ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक आहे. सिद्धेश आणि पूजा दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
कधी करणार पूजा लग्न?
पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून अभिनेत्री केव्हा लग्न करणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. पूजाने आता लग्नाबद्दल सांगितलं की, सावंत आणि चव्हाण कुटुंबियांनी लग्नाबाबत ठरवलं आहे. सध्या आम्ही दोघंही कामात व्यस्त आहोत. त्यामुळे लग्नाची बोलणी सुरु आहे.