अभिनेत्री पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा, राज कुंद्राबद्दल म्हणाली...
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने तिची बाजू लोकांसमोर ठेवली आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि सुप्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला काल रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि काही अॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप आहे. या आरोपांबाबत अद्याप राज कुंद्रा किंवा शिल्पा शेट्टीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अटकेनंतर राज कुंद्रा यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने तिची बाजू लोकांसमोर ठेवली आहे.
पूनमला शिल्पाबद्दल वाटलं वाईट
पूनम पांडेने एक व्हिडीओ स्टेटमेंट जारी करत म्हटलं आहे की, 'यावेळी मला शिल्पा शेट्टीसाठी वाईट वाटत आहे. तिच्यावर आणि तिच्या मुलांची मला दया वाटत आहे. ती आत्ता कोणत्या टप्प्यातून जात आहे याची मी कल्पनाही करू शकत नाही. आणि यासाठी मी संधी साधत मी स्वत:ला हायलाईट करु ईश्चित नाही. मी 2019 मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. यासह घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस व कायदेशीर प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
पूनम पांडेने राज कुंद्रावर केले गंभीर आरोप
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेने राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते की, राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने तिचे व्हिडिओ आणि फोटो बेकायदेशीररित्या वापरले आहेत. पूनम म्हणाली की, दोघांमध्ये कॉन्ट्रक्ट पेमेंट मध्ये झालेल्या अनियमिततेमुळे दोघांमधील करार संपुष्टात आला होता. तर दुसरीकडे राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाह यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. अशा परिस्थितीत या प्रकरणातील ताराही पूनमच्या प्रकरणात कुठेतरी संबंधित आहेत.
राजवर केला अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप
नुकत्याच झालेल्या प्रकरणावर मुंबई पोलिसांनी सांगितलं की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अश्लील चित्रपट बनविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही अॅप्सद्वारे हे चित्रपट बनवले जातात व प्रकाशित केले जातात असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.या प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं. आयुक्तांनी सांगितलं की तपासणी दरम्यान असं आढळलं की, राज कुंद्रा हा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांना अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. यानंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली.