Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. या अफवेने देशभरात एकच खळबळ उडाली होती. पूनम पांडेने तिच्या मृत्यूची अफवा पसरवून पब्लिसिटी स्टंट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूनम पांडेचा मृत्यू झाला नसून ती ठणठणीत असल्याचं समोर आल्यानंतर लोकांनी तिच्यावर सडकून टीका करत खरं खोटं सुनावलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची पोस्ट केली होती. मात्र, त्यानंतर 24 तासांनंतरच तिने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन तिचा मृत्यू झाला नसल्याचे म्हणत सर्व्हायरल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे पाऊल उचलल्याचे तिने म्हटलं आहे. पण या प्रकरणात आता एक धक्कादायक ट्विस्ट आला आहे. पूनम पांडे एक महिन्यापासून तिच्या खोट्या मृत्यूची प्लानिंग करत आहे. तर, यामागचे कारण खरंच कर्करोगाप्रती लोकांची जनजागृती होते का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. 


शनिवारी पुनमने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत म्हटलं होतं की ती जिवंत आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन वेबसाइट www.poonampandeyisalive.com बाबत सांगितले. गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगाची जनजागृती करण्यासाठी #DeathToCervicalCancer साठी ही वेबसाइट लाँच करण्यात आली आहे. तसंच, निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावेळी सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीकरणासंदर्भात केलेल्या मोहिमेचाही उल्लेख केला. तिने म्हटलं होतं की, बजेटमध्ये फ्री सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीकरणाबाबत बोलणं झालं. तर दुसरीकडे पूनमच्या मृत्यूच्या अफवेने सर्व्हायकल कॅन्सरची मोहिम सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात तसं नसल्याचे समोर आले आहे. 


एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डोमेन नोंदणीकरणच्या नोंदीनुसार, पूनमच्या वेबसाइटची नोंद 18 जुलै 2023 रोजीच रजिस्टर करण्यात आली होती. त्यामुळं पूनमने तिच्या फेकडेथचा खेळ काही महिन्यांपूर्वीच रचला असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. 


दरम्यान, पूनम पांडेचे वय 32 असून 2013मध्ये नशा या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तसंच, गेल्या 11 वर्षांत तिने एकदाही सोशल मीडियावर कोणत्या आजाराचा उल्लेख केला नव्हता. तसंच, कोणत्याही आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोस्ट किंवा कॅम्पेन चालवले नव्हते. त्यामुळं अचानक सर्व्हायकल कॅन्सरबाबतच तिने हे पाऊल का उचललं असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. 


पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर, गेल्या दोन दिवसांत तिने लाखो फोलोवर्स कमावले आहेत.