रमजाननिमित्त पूनम पांडेचा अनोखा अंदाज...
बॉलिवूड अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशल पूनम पांडे तिच्या हॉट, सेक्सी लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशल पूनम पांडे तिच्या हॉट, सेक्सी लूकमुळे नेहमी चर्चेत असते. पण यावेळेस तिने शेअर केलेला फोटो पाहुन तुम्हाला थोडा धक्का बसेल. सोशल मीडियावर नेहमी हॉट फोटोज अपलोड करणाऱ्या पूनमने तिचा नवा अवतार चाहत्यांसमोर आणला आहे.
पूनमचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्याही भरभरुन प्रतिक्रीया येत आहेत. रमजान निमित्ताने पूनमला बुरख्यात पाहुन चाहत्यांना काहीसा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बुरखा घालून ती एका दुकानातून खजूर विकत घेत आहे आणि त्याची चवही चाखत आहे.
यापूर्वी पूनमने एक टॉपलेस फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देण्याचे सुचवले होते. तो फोटो चांगलाच व्हायरल झाला.
पूनम तिच्या टॉपलेस, न्यूड फोटोजमुळे नेहमी चर्चेत राहते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतात. यापूर्वी टीम इंडिया वर्ल्डकप जिंकल्यानंतर न्यूड होण्याच्या वक्तव्यामुळे ती चर्चेत होती.