पूनम पांडेने टॉपलेस फोटो शेअर करत राहुल द्रविडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे.
नवी दिल्ली : आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे. ती नेहमीच आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. आता भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड याच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला.
द्रविडला अशा दिल्या शुभेच्छा
द्रविडने ११ जानेवारीला त्याचा ४४ व्या वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने द्रविडच्या मित्रपरिवाराने आणि मित्रांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र पूनमने तिच्या हॉट अंदाजात द्रविडला शुभेच्छा दिल्या. तिने टॉपलेस फोटो शेअर करत द्रविडला विश केले.
आपला टॉपलेस फोटो शेअर करत तिने लिहिले की, नो कॅप्शन. हॅशटॅग हॅपी बर्थडे द्रविड.
फॅन्ससाठी नवे केले अॅप सुरू
गेल्या वर्षी पूनमने आपल्या फॅन्ससाठी एक अॅप सुरू केले होते. हा अॅप पूर्णतः माझ्यावरच आहे, असे त्यावेळी पूनमने सांगितले होते. तुम्हाला मी बोल्ड वाटते तर माझा अॅप देखील त्याचप्रमाणे आहे. मला जे हवे ते पोस्ट करण्याचे स्वातंत्र्य मला इथे आहे, असेही ती म्हणाली होती.