रेखाला पुन्हा विचारला तोच प्रश्न
सोशल मीडियावर रेखा ट्रोल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिशा पटानी सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती कायम इंस्टाग्राम अकाऊंटवर अपडेट करत असते. असाच एक फोटो तिने रविवारी शेअर केला ज्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. अगदी 24 तासांत या फोटोला 11 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
या फोटोत दिशाने रेखासोबत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रेखा अगदी 'सुहागन' कपाळात सिंदूर आणि हातात भरपूर बांगड्या घालून अगदी विवाहित महिलेप्रमाणे दिसत आहे. तिच्या या फोटोमुळे सगळीकडेच चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर दिशा पटानीने हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी असंख्य प्रश्न विचारले. रेखा या गेटअपवर अगदी विवाहित महिलेप्रमाणे दिसत आहे. रेखाने सिंदूर पहिल्यांदा लावलेलं नाही या अगोदर देखील ते या रुपात दिसली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेखा चर्चेत आली आहे. रेखा कुणाच्या नावाचं सिंदूर लावते असा चाहत्यांनी प्रश्न केला आहे. आपल्याला माहितच आहे रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाची गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा आहे.
रविवारी रेखा मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राजस्थानच्या उदयपुरमध्ये पोहोचली. यावेळी महाराणा प्रताप विमानतळावर रेखासोबत अनेक बॉलिवूड कलाकार देखील दिसले.
दिशा पटानीद्वारे शेअर केलेले फोटो याच कार्यक्रमातील असून रेखा आणि दिशा या दोघीही कार्यक्रमावर दिसल्या होत्या. दोघी एकाच गेटअपमध्ये या कार्यक्रमात दिसल्या.