मुंबई : बंगाली टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका बसला आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्तीचे (Sonali Chakraborty)  निधन झाले आहे. सोनालीनं चक्रवर्तीने 31 ऑक्टोबर रोजी सकाळी कोलकाता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोनाली चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली चक्रवर्तीच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोनाली चक्रवर्तीनं हिट बंगाली टीव्ही मालिका 'गाचोरा' (Gaatchora)  मध्ये काम केले होते. सोनाली चक्रवर्तीने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये आलेल्या 'हार जीत' या चित्रपटातील सोनाली चक्रवर्तीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 'बंधन' चित्रपटातून सोनाली चक्रवर्तीनेही आपली छाप सोडली.



मात्र, प्रकृतीच्या समस्येमुळे सोनाली चक्रवर्तीने चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करणे बंद केले. या वर्षी ऑगस्टमध्ये सोनाली चक्रवर्तीलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिचे पती शंकर चक्रवर्ती यांनी सोनालीला यकृताचा त्रास असल्याचे सांगितले होते. पोटात पाणी भरलं. इतर समस्या, ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Popular Bengali Tv Film Actress Sonali Chakraborty Passes Away Was Unwell For Sometime Fans And Industry Mourn Her Demise) 



मात्र, यानंतर सोनाली चक्रवर्ती बरी होऊन घरी परतली. आता सोनालीचं काय झालं आणि कोणत्या समस्येवर रुग्णालयात उपचार सुरू होते, हे कोणालाही कळू शकलेलं नाही. सध्या सोनाली चक्रवर्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशिवाय अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियावरही त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.