मुंबई : लोकप्रिय कोरियन ड्रामाचा Hometown Cha Cha Chaअभिनेता  Kim Seon-ho बद्दल बरीच चर्चा आहे. अभिनेता  Kim Seon-ho ने एक्स-गर्लफ्रेंडची माफी मागितली आहे. यामागे एक मोठे कारण आहे. खरंतर, अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केले होते. एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं होतं की, अभिनेत्याने लग्नाचे खोटं आश्वासन दिलं आणि नंतर तिला एबॉर्शन करण्यास भाग पाडलं. या संदर्भात, Kim Seon-ho ने माफी मागितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Kim Seon-ho ने त्याच्या गर्लफ्रेंडला गर्भपात करण्यास भाग पाडलं
Kim Seon-ho च्या एक्स गर्लफ्रेंडने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने सांगितलं की, ती एका अभिनेत्याला डेट करत आहे, ज्याने तिच्याशी लग्नाचं खोटं आश्वासन दिले आणि नंतर जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडलं. गर्लफ्रेंडने अभिनेत्याचं नाव कुठेही घेतले नाही. परंतु आता अभिनेत्याच्या माफीनंतर हे स्पष्ट झालं आहे की, ती Kim Seon-ho बद्दल बोलत होती.


Kim Seon-ho ने गर्लफ्रेंडची मागितली माफी 
ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेक दिवसांनी Kim Seon-ho ने माफी मागितली आहे. अभिनेता म्हणाला की, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायचं आहे आणि तिची माफी मागायची आहे. Kim Seon-ho ने लिहिलं की, त्याने त्याच्या निष्काळजीपणामुळे आणि विचारहीन कामामुळे तिला दुखावलं होतं. कोरिअन पॉप संस्कृतीची माहिती देणाऱ्या सोम्पी या वेबसाइट मार्फत अभिनेत्याची माफी मागितली आहे. त्यात स्पष्टपणं लिहिलं आहे की, 'मी Kim Seon-ho आहे. या उशीरा कमेंटबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.


काही दिवसांपूर्वी माझ्या नावाने प्रसिद्ध झालेला लेख वाचल्यानंतर मला पहिल्यांदा भीती वाटली. म्हणूनच मी हे लिहित आहे. की, मी तिच्यासोबत जे वागलो ते खूप चूकीचं आहे. मी माझ्या वृत्तीने तिला दुखावलं आहे. मला तिला भेटून माफी मागायची होती. पण मी तिची योग्य प्रकारे माफी मागू शकत नाही आणि आता फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे.



Kim Seon-ho ला मोजावी लागली किंमत 
Kim Seon-ho ची ही घोषणा आगीसारखी पसरली. बातमी पसरताच, व्हरायटी शो 2 दिवस आणि 1 नाईटने अभिनेत्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि सांगितलं की, तो यापुढे चौथ्या सीझनचा भाग होणार नाही. शोच्या निर्मात्यांनी हे स्पष्ट केलं की, ते  Kim Seon-hoचा काही भाग जुन्या सीझनमधून संपादित आणि काढून टाकतील. ते हे यासाठी करत आहेत जेणेकरुन प्रेक्षक अस्वस्थ होऊ नयेत.