मुंबई : मातृत्त्वाचं सुख हे प्रत्येक महिलेला परिपूर्ण करणारं असतं असं म्हटलं जातं. किंबहुना हा आनंद आयुष्य पूरतं बदलणारा ठरतो. नवे अनुभव देणारा ठरतो. जगात अशा कित्येक महिला आहेत ज्यांनी हे सुख अनुभवलं असेल. पण, सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा होत आहे, जिच्या मातृत्तावाची जबरदस्त चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारणही तसंच आहे. लोकप्रिय R&B गायिका आणि अभिनेत्री Keke Wyatt हिनं नुकतंच तिच्या मातृत्वाची माहिती दिली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


चाहत्यांसाठी ही बातमी थक्क करणारी होती, कारण ती 11 व्या वेळेस आई होणार आहे. 


केके याआधीच 10 मुलांची आई आहे. तिनं इन्स्टा अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली. 


'पती जकारिया डेव्हिड डेरिंग आणि मी हे जाहीर करते की आमच्या कुटुंबात आणखी एल लहान मुल येणार आहे. हे माझं 11 वं बाळ असणार आहे', असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं. 


केके आणि जकारिया डेव्हिड 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. याआधी तिनं दोन लग्न केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी तिनं रेहमत मॉर्टन यांच्याशी लग्न केलं.


लग्नानंतर काही वर्षांतच त्यांच्या नात्यातून घरगुती हिंसा आणि मतभेदांच्या बातम्या समोर आल्या. 2009 मध्ये ते विभक्त झाले. 



रेहमत आणि केकेची 3 मुलं आहेत. 2011 मध्ये केकेनं मायकल जमार फोर्डशी लग्न केलं. यांच्या नात्यातूनही 3 मुलांचा जन्म झाला. पुढे 2017 पर्यंत केके 8 मुलांची आई होती. 


2018 मध्ये तिनं मोर्टनपासूनही घटस्फोट घेतला. त्याच वर्षी तिनं आपला बालमित्र आणि एक्स बॉयफ्रेंड जकारिया डेरिंग याच्याशी लग्न केलं. हे केकेचं तिसरं लग्न. त्याच्यापासून तिला 2 मुलं होती. त्यातच आता केके पुन्हा एकदा गरोदर असल्यामुळं ती आता 11 व्या बाळाला जन्म देणार आहे.