MC Stan Attack: आता जमाना आहे तो सोशल मीडियाचा त्यामुळे येथे प्रसिद्ध होणाऱ्या सोशल मीडिया स्टारची (M.C.Stan) सर्वत्र चर्चा असते. त्यातून सध्या रॅपर्सची तर सोशल मीडियावर चांगली हवा आहे. हे तरूण वल्ली हरएक वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकून आहेत. त्यामुळे त्यांची इंटरनेटवर (Internet Sensations) जोरात चर्चा असते. सध्या सगळीकडेच हवा आहे ती म्हणजे एम.सी.स्टॅन (M.C.Stan Live Concerts) या गायकाची. हा एक रॅपर (Rapper) आहे. 23 वर्षीय एम.सी.स्टॅनचे इन्टाग्रामवर 1 कोटीहून अधिक फॉलोवर्स आहे. त्याच्यावर प्रेम करणारे चाहते हे त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमांनाही आवर्जून उपस्थित दर्शवतात. त्याचा अशाच एका शोला प्रेक्षकांची तुडूंब गर्दी होती. (popular rapper m c stan hydrabad show cancelled a unknown fan throw bottle on him video viral)


नक्की काय घडला प्रकार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या भर कार्यक्रमात मात्र काहीतरी भलतंच पाहायला मिळाले आहे. आपले जसे फॅन्स असतात तसे आपले टीकाकारही असतात. एम.सी.स्टॅनला ऐकायला आलेल्या चाहत्यांच्या गर्दी अशा एका अज्ञात व्यक्तीनं एम.सी.स्टॅनवर पाण्याची बाटली फेकल्याचा व्हिडीओ (M.C. Stan Attack) व्हायरल होतो आहे. 10 मार्च रोजी एम.सी.स्टॅनचा हैद्राबाद येथे एक लाईव्ह कॉन्सर्स्ट सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हजारो लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी एम.सी.स्टॅनचा शो हा रंगत आला होता तेवढ्यात त्याच्यावर कोणतरी बाटली फेकल्याचे दृश्य दिसते आहे. या व्हिडीओवर अनेक जण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 


त्याचा हैद्राबाद शो कॅन्सल (Live Concert) झाला असल्याचीही बातमी कळते आहे. दोन दिवसांपुर्वी त्याच्या लाईव्ह कॉनर्स्टमध्ये एक माणूस पडल्यानं गोंधळ उडाला होता. ते पाहून त्यानं आपलं गाणंही थांबवलं होतं. हे पाहून अनेकांनी त्याचे कौतुकही केले होते. परंतु हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. हा व्हिडीओ 'दुनिया दिवाना' या नावाच्या इन्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 


कोण आहे एम.सी.स्टॅन? 


एम.सी.स्टॅन हा पुण्याचा असून त्याला लहान वयातच मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यांचे इंटरनेटवर तुफान व्हिडीओज हे व्हायरल होत असतात आणि सोबतच त्याच्या लोकप्रियतेतही दिवसागणिक वाढ होते आहे. त्याला अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्याची सगळीकडेच चलती आहे. पुर्णत: पाश्चात्त्य वेशभुषा, अंगावर अनेक ऑरनामेंट्स आणि हटके हेअरस्टाईल आणि डोळ्यावर स्टायलिश ग्लासेस यामुळे त्याची फॅशनही चर्चेचा विषय असतो. सध्या त्याच्या गाण्यांनाही त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्याची तरूणाई ही सुगम संगीतही ऐकते आणि पाश्चात्त्यही त्यामुळे आज संगीताच्या कक्षाही रूंदावताना दिसत आहेत. एम.सी.स्टॅनचाही वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.