मुंबई : मराठीतील सुपर हीट सिनेमा 'पोस्टर बॉईज' चा रिमेक हिंदीमध्येही करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर हीट सिनेमाचा फॉर्म्युला आणि देओल बंधूंची उत्तर भारतातील फॅन फॉलोविंग पाहून हिंदीतील 'पोस्टर बॉईज'ही दमदार कमाई करेल असा होता. 


 'पोस्टर बॉईज'च्या बरोबरच हिंदीमध्ये अरूण गवळींच्या आयुष्यावर आधारित 'डॅडी' हा सिनेमाही प्रदर्शित झाला. पण या दोन्ही चित्रपटांना फार दमदार ओपनिंग मिळालेले नाही. हे दोन्ही चित्रपट  बॉक्सऑफिसवर संथगतीने काम करत आहेत. 
 पोस्टर बॉईजला १५ % प्रतिसाद मिळाला आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे कळते. 




 मराठी सिनेमाप्रमाणेच नसबंदीच्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘पोस्टर बॉईज’चे दिग्दर्शन श्रेयस तळपदेने केले असून, सनी देओल आणि बॉबी देओल हे देओल बंधूंची जोडी अनेक वर्षांनी एकत्र पहायला मिळणार आहे. यांच्या सोबतच सोनाली कुलकर्णीही या चित्रपटात दिसणार आहे.