रावणाच्या लूकमध्ये मोठा बदल...,आदिपुरुषचा ट्रेलर लीक, पाहा Video
Adipurush Trailer LEAKED: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि साऊथ सुपरस्टार प्रभास यांचा `आदिपुरुष` हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Adipurush Trailer Leaked: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा आदिपुरुष (Prabhas Adipurush Movie) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे. तसेच या चित्रपटाचे काही पोस्टर्सही रिलीज करण्यात आले आहे. त्यातच आज या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाता ट्रेलर आज दुपारी प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाच्या काही तास आधीच या चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आदिपुरुष हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या ट्रेलरकडे वेधले होते. काल (8 मे 2023) हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या काही खास चाहत्यांसाठी या चित्रपटाचे ट्रेलरचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी जमली होती. याचदरम्यान काहींना हा ट्रेलर त्यांच्या मोबाईलर शूट केला. अन् अखेर आज (9 मे 2023) दुपारी ट्रेलर रिजील होण्यापूर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये श्री राम, लक्ष्मण सीतेसोबत वनवासात जात असतात. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसतायत. त्यानंतर हनुमानाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे ट्रेलरमध्ये एन्ट्री दाखवली असून लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना दाखवला आहे. यानंतर रावणाची म्हणजे सैफ अली खानची एन्ट्री दिली आहे. मात्र गेल्या वर्षी रावणाच्या लूकवरुन झालेल्या वादानंतर या व्हायरल ट्रेलरमध्ये रावणाचे लूक बदलण्यात आले आहे.
आदिपुरुष चित्रपटाची स्टार कास्ट
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. तसेच सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारणार असून देवदत्त नागे हनुमानाची भूमिकेत दिसणार आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असता. मात्र काही कारणास्तव चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तसेच सैफ अली खानच्या लूकवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. आदिपुरुषमध्ये सैफ अली खानने रावणाची भूमिका साकरली आहे. त्याची हेअरस्टाईल आणि लूक पाहून नेटकऱ्यांनी सैफची तुलना मुघलांशी केली. या आक्षेपानंतर सैफच्या ही लूकमध्ये बदल करण्यात आले. तर सीतेची भूमिका साकारणाऱ्या क्रितीच्या भांगेत सिंदूर का नाही? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केल्यानंतर सीता नवमी रोजी प्रदर्शित झालेल्या पोस्टमध्ये क्रितीच्या भांगेत सिंदूर दाखवण्यात आले.