Prabhas and Rajinikanth photo viral : दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार आणि आता आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवलेल्या 37 वर्षीय प्रभास (Prabhas) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तर दुसरीकडे अभिनेता आणि महाराष्ट्रातील जन्म असलेले रजनीकांत (Rajinikanth) यांची लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांमध्ये एवढी आहे की, त्यांचे चाहचे त्यांना प्रेमाने थलायवा असे म्हणतात. मात्र आता बाहुबली फेम प्रभास आणि सुपरस्टार रजनीकांत हे एका वेगळ्याच कारणाने दोघेही सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर (Prabhas and Rajinikanth photo vir) प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामुळे प्रभास जबरदस्त ट्रोल झाला. या व्हायरल फोटोमध्ये0 त्याच्यासोबत रजनीकांत व शिवा राजकुमारही (Rajinikanth and Shiva Rajkumar) दिसताहेत. नेमकं या व्हायरल फोटो मागे काय सत्य आहे जाणून घेऊया... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सालार' (Salaar) अभिनेता प्रभासचे दोन चित्रपट 2023 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. बाहुबली (Prabhas) नंतर प्रभासचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.  साहो आला नंतर पाठोपाठ राधेश्याम हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला गेला. मात्र यावेळेस प्रभासच्या सिनेमाची नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोची आहे. प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होतोय. या व्हायरल फोटोमध्ये रजनीकांत व शिवा राजकुमारही दिसताहेत. 



या व्हायरल फोटोमध्ये प्रभास खूपच लठ्ठ दिसत आहे. अर्था हा फोटो मॉर्फ केलेला आहे. या फोटोमध्ये प्रभास नसून रजनीकांत आणि शिवा कुमारसोबत कोणीतरी दुसरीच व्यक्ती आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रभासचा फोटो चिकटवण्यात आला आहे. मात्र तरीही चाहत्यांकडून प्रभासला ट्रोल करण्यात आले. अरेरे, प्रभासला काय झालं, इतका वाईट... तर दुसऱ्या युजर्सने त्याला अंकल असं म्हणत कमेंट दिली आहे. 


प्रभास 'राधे श्याम' या शेवटच्या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तर दुसरीकडे ‘राधेश्याम’ या चित्रपटात प्रभास लीन लुकमध्ये दिसला होता. पण प्रमोशनदरम्यान त्याचं अचानक वजन वाढलेले दिसलं. त्याचं वाढलेले वजन पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. परिणामी आता पुन्हा प्रभास त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आला असून त्याच्या वजनामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. प्रभास लवकरच त्याचा 'सालार' हा चित्रपट 'आदिपुरुष' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.