मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा 'बाहुबली' फेम अभिनेता आणि 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर ही जोडी बहुचर्चित 'साहो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साहो चित्रपटाची मोठी चर्चा आहे. नुकतंच 'साहो'ती एका नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सायको सैया' असं या गाण्याचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासने सोशल मीडियावर 'साहो'तील 'सायको सैया' गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्याच्या टीझरमधूनच प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. श्रद्धा आणि प्रभासच्या डान्स मूव्ह्जची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ८ जुलैला 'सायको सैया' गाणं प्रदर्शित करण्यात येणार आहे. 





सुजिथने लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचत्या निर्मितीची धुरा युव्ही क्रिएशन्स, टी सीरिज आणि धर्मा प्रोडक्शन्सने सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त नील नितीन मुकेश, अरुण विजय आणि एवलिन शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. एकाच वेळी हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साहोच्या निमित्ताने श्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे सर्वावार्थाने 'साहो' प्रदर्शनापूर्वीच कुतूहलाचा विषय ठरत आहे. जवळपास ३०० कोटींच्या निर्मिती खर्चातून साकारला जाणारा हा चित्रपट १५ ऑगस्ट, २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. 


सुजिथने लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा युव्ही क्रिएशन्स, टी सीरिज आणि धर्मा प्रोडक्शन्सने सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त नील नितीन मुकेश, अरुण विजय, एवलिन शर्मा, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. 


एकाच वेळी हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साहोच्या निमित्ताने श्रद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे सर्वार्थाने 'साहो' प्रदर्शनापूर्वीच कुतूहलाचा विषय ठरत आहे. जवळपास ३०० कोटींच्या निर्मिती खर्चातून साकारला जाणारा हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.


'बाहुबली २' नंतर 'साहो' प्रभासचा पहिलाच चित्रपट आहे. 'बाहुबली २'च्या जबरदस्त कमाईनंतर आता 'साहो' बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.