GQ इंडिया मासिकावर झळकला प्रभासचा हॅन्डसम अंदाज
बाहुबली चित्रपटातून जगभरात पोहचलेला अभिनेता प्रभासच्या नववर्षाची सुरूवात खास झाली आहे.
मुंबई : बाहुबली चित्रपटातून जगभरात पोहचलेला अभिनेता प्रभासच्या नववर्षाची सुरूवात खास झाली आहे.
२०१८ सालच्या जीक्यु मासिकाच्या पहिल्या अंकाच्या कव्हरवर प्रभासचा फोटो झळकला आहे.
चाहत्यांना शुभेच्छा
२०१८ या नववर्षाच्या शुभेच्छा देताना प्रभासने जीक्यू मासिकातील त्याचा फोटो शेअर केला आहे. बाहुबलीतील रांगड्या लूकमधील प्रभास जीक्युच्या मासिकावर मात्र हॅन्डसम अंदाजामध्ये आहे.
प्रभासने फोटो शेअर करताच काही वेळातच तो सोशल मीडियामध्येही ट्रेन्ड होण्यास सुरूवात झाली. चाहत्यांनाही प्रभासचे हे नवीन वर्षाचे गिफ्ट फारच आवडले.
रॉयल लूक
जीक्यूच्या कव्हरपेजवर प्रभास रॉयल ब्लू थ्री पीस सूटमध्ये दिसतोय. ग्रे - ब्लू रंगाचे शर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचा टाय खुलून दिसत आहे
'साहो'
बाहुबलीनंतर प्रभास 'साहो' या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 'साहो' चित्रपटामध्ये प्रभास सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. 'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचे अॅक्शन सिक्वेंस हे एक आकर्षण ठरणार आहे.