मुंबई : तेलुगू सुपरस्टार प्रभासचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. 'बाहुबली' मालिकेच्या यशानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. खासकरून साऊथमध्ये चाहते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारसाठी वेडेपणाच्या हद्दीपर्यंत जातात. आता प्रभासच्या अशाच एका चाहत्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चाहत्याने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहते सिनेमाची वाट पाहतायेत 
खरंतर या चाहत्याने प्रभासच्या आगामी 'सालार' चित्रपटाबाबत ही धमकी दिली आहे. या चित्रपटाबाबत अपडेट न दिल्यास जीव देऊ, अशी धमकी त्याने दिली आहे. खरंतर, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना निर्माते या चित्रपटाबद्दल कोणतीही अपडेट शेअर करत नाहीत. 'सालार'चे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत.  ज्यांच्या 'KGF 2' या चित्रपटाने अलीकडच्या काळात संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे.


चाहत्याने काय लिहिलं?
प्रभासच्या चाहत्याने 'सुसाइड लेटर' लिहिलं आहे. हे लेटर  सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या चाहत्याने लिहिलं आहे की, 'आम्ही आधीच दु:खी आणि निराश आहोत कारण 'साहो', 'राधे श्याम' आणि प्रभासच्या याआधीच्या चित्रपटांबाबतही असंच घडलं आहे. या महिन्यात 'सालार'ची झलक दाखवली नाही. तर मी नक्कीच आत्महत्या करेन. आम्हाला 'सलार'च्या अपडेट्स हव्या आहेत.



प्रभाससोबत हे स्टार्स दिसणार आहेत
'सालार' बद्दल सांगायचं झालं तर, हा प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात थरारक आणि हिंसक चित्रपट असेल. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, दिशा पटानी आणि जगपती बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग 2022 च्या अखेरीस पूर्ण होईल असं मानलं जात आहे.