प्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा
बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.
मुंबई : बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला. प्रभास दक्षिण भारतातला दिग्गज कलाकार आहे पण बाहुबलीमुळे त्याला देशात आणि जगभरात ओळख मिळाली. बाहुबली-2मध्ये प्रभास दक्षिणेतली अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत दिसला. यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली.
प्रभास आणि अनुष्कानं माध्यमांसमोर त्यांच्या नात्याविषयी कधीच भाष्यं केलेलं नाही. पण प्रभासचे काका कृष्णम राजू यांनी प्रभासच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रभास यावर्षी लग्न करेल असं वक्तव्य कृष्णम राजू यांनी केलं आहे. कृष्णम राजूही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहेत. बाहुबली चित्रपट रिलीज होताच प्रभास लग्न करेल असं याआधी कृष्णम राजू म्हणाले होते.
प्रभास सध्या साहो चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर प्रभास एका बॉलीवूड चित्रपटातही दिसणार आहे, अशी बातमी बॉलीवूडलाईफ डॉट कॉमनं दिली आहे. साहोचं शूट संपल्यावर प्रभास या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.