मुंबई : प्रभुदेवा यांचा 'गुलबकावली' हा एक कॉस्च्युम ड्रामा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या चित्रपटाद्वारे त्यांनी 'बाहुबली' या चित्रपटाला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस. एस. राजोमौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटानं इतर कॉस्च्युम ड्रामा चित्रपटांमध्ये एक वेगळीच उंची प्रस्थापित केलीय. त्याला आव्हान देण्यासाठी प्रभुदेवा यांना आपल्या चित्रपटाचं बजेटदेखील वाढवावं लागलंय.  


कॉस्च्युम ड्रामा चित्रपटासाठी एक आव्हान 


'गुलबकावली' या चित्रपटाचे काही दृश्य 'बाहुबीली'ला टक्कर देणारे असावेत, असा चंगच दिग्दर्शक कल्याण एस. यांच्या टीमनं बांधलाय. १०-१५ मिनिटांचं फुटेजही 'बाहुबली'ला आव्हान देऊ शकेल, असं व्हायला हवं... तरच आम्हाला आनंद मिळेल, असं प्रभुदेवा यांनी म्हटलंय.


राजामौली यांचं कौतुक


'कॉस्च्युम ड्रामा' चित्रपटांचा बाज आता बदललाय. तरी 'गुलबकावली' या चित्रपटाचे इफेक्टस दयायला आम्हाला तीन महिने लागले तरी हरकत नाही... पण त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना हा चित्रपट बघताना पूर्ण आनंद मिळू शकेल... आणि राजामौली यांना तर मी खूप वर्षांपासून ओळखतो. त्यांनी प्रत्येक वेळेला एक वेगळंच आव्हान तयार केलंय... मी त्यांचा 'राऊडी राठोड' हा चित्रपट हिंदीमधून तयार केला... मला भविष्यात त्यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल, असं म्हणत प्रभुदेवानं राजामौली यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.