शुटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्डने `या` अभिनेत्रीचा घेतला चावा
सिनेमाप्रमाणे आता मालिकांमध्ये देखील अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. पण अॅक्शन सीन कधी कलाकाराच्या जीवावर बेतेल सांगू शकत नाही. असंच काहीस स्टार प्लस वाहिनीवरील `इक्यावन` मालिकेत घडलं आहे. मालिकेची लीड अभिनेत्री प्राची तहलान हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. शुटिंग दरम्यान प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने चावलं आहे. मात्र आपल्या कामात पॅशनेट आणि हार्डवर्किंग असलेल्या या अभिनेत्रीने इथे देखील प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे.
मुंबई : सिनेमाप्रमाणे आता मालिकांमध्ये देखील अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. पण अॅक्शन सीन कधी कलाकाराच्या जीवावर बेतेल सांगू शकत नाही. असंच काहीस स्टार प्लस वाहिनीवरील 'इक्यावन' मालिकेत घडलं आहे. मालिकेची लीड अभिनेत्री प्राची तहलान हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. शुटिंग दरम्यान प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने चावलं आहे. मात्र आपल्या कामात पॅशनेट आणि हार्डवर्किंग असलेल्या या अभिनेत्रीने इथे देखील प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे.
नेमकं काय घडलं?
मालिकेतील एका दृश्यात प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्यासाठी शूटिंग करायची होती. मात्र याचदरम्यान ही दुर्घटना घडली. अचानकच हा कुत्रा प्राचीच्या अंगावर धावून गेला. त्याने चक्क तिचा पाठलाग केला. अशात प्राचीने स्वत:चा बचाव करण्यासाठी बाजूलाच असलेली एक काठी उचलून कुत्र्यास मारण्यास सुरुवात केली. मात्र अशातही त्याने तिला चावा घेतला. बराच वेळ रंगलेल्या या प्रकारानंतर कुत्र्याने धूम ठोकली.
कुत्र्याशी केले दोन हात
या घटनेबद्दल सांगताना प्राचीने म्हटले की, त्याने माझ्या शरीराच्या खालच्या भागावर हल्ला केला. काठी उचलण्याच्या नादात त्याने मला चावा घेतला. यात मी जखमी झाली आहे. दरम्यान, प्राचीला लगेच डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्राचीने पुढे म्हटले की, मला लगेचच दोन इंजेक्शन घ्यावे लागले. तसेच आणखी पाच इंजेक्शन घेण्याचाही डॉक्टरांनी सल्ला दिला. दरम्यान, कुत्र्याने चावा घेतल्याने प्राचीला त्याच्या प्रचंड वेदना होत आहेत. मात्र अशातही ती पुढच्या एपिसोडची शूटिंग करीत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितले आहे.
कुत्र्याने चावल्यामुळे प्राचीला मोठ्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. असं असलं तरीही प्राचीने आपलं शुटिंग पूर्ण केलं आहे. मात्र आता तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.