मुंबई : अभिनेते प्रदीप पटवर्धन (pradip Patavardhan) यांचे निधन झालेले आहे. मुंबईच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मोरूची मावशी हे अतिशय गाजलेले नाटक होतं. याशिवाय मालिका चित्रपट नाटकात त्यांचा सहभाग होता. रंगभूमीवरचा हसता-खेळता नट काळाच्या पडद्या आड गेल्यामुळे कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं, असं म्हणायला हरकत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी दुरचित्रवाणी यांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. 'मोरुची मावशी' या नाटकातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर प्रदीप यांच्या 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने देखील प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं. एवढंच नाही तर 'महाराष्ट्राची जत्रा' कार्यक्रमातून त्यांनी सर्वांना पोट धरुन हसण्यास भाग पाडले. 


आपल्या कामातून सर्वांना हसवणारे प्रदीप पटवर्धन आता मात्र मनाला चटका लावून गेले आहेत. पण आता ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कलेच्या माध्यमातून मात्र कायम आपल्यासोबत असतील.  


प्रदीप पटवर्धन यांचे सिनेमे
'एक फुल चार हाप', 'डान्स पार्टी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'एक शोध', 'चष्मे बहाद्दर', 'गोळा बोरीज', 'जर्नी प्रेमाची', 'थँक यू विठ्ठला' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मोलाची भूमिका साकारली.