मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा दुर्देवी मृत्यू झालाय. मालाडमध्ये रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रफुल्लने झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका कुंकूमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. यात त्याने जानकीचा भाऊ गणेशचे पात्र साकारले होते.


तसेच कलर्स वाहिनीवरील तू माझा सांगाती या मालिकेतही प्रफुल्लने काम केले होते. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बारायणमध्येही त्याची भूमिका होती. त्यासोबतच स्टार प्रवाहमधील नकुशीमध्येही त्याची भूमिका होती.