मुंबई : तरूणाईच्या मनातील संकल्पना, त्यांचा दृष्टीकोन, त्यांची जीवनशैली, करिअरची व्याख्या, सौंदर्याविषयीचं मतं इतकच नव्हे तर समाजात घडणाऱ्या गोष्टींवरील स्पष्ट भाष्य हे सगळंच ठाम असतं. आज प्रत्येक ठिकाणी तरूणाई त्यांचं बेस्ट देत आहे. अशा तरूणाईचा सन्मान करण्यासाठी तसेच तरूणाईचं हे काम लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी  झी युवा वाहिनीने एक पाउल पुढे टाकले आहे. छोट्या पडदयावरील प्रत्येक वाहिनी पुरस्कार सोहळे आयोजित करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकारांना त्यांच्या कामाची पावती देत असते. प्रेक्षकांकडून कलाकारांच्या पाठीवर थाप मारली जात असते. मग समाजातील रिअल हिरो असलेल्या तरूणाईच्या शीरपेचातही सन्मानाचा तुरा रोवण्यासाठी नावातच युवा असलेल्या झी युवा या वाहिनीने झी युवा सन्मान पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर अभिनेत्री प्राजक्ता माळी एक अनोखा पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झी युवा तेजस्वी चेहरा हा पुरस्कार प्राजक्ता माळी हिने पटकावला असून सध्या प्राजक्तावर कौतुकाची बरसात होत आहे.


झी युवा सन्मान  पुरस्कारांचे मानकरी कोण होणार याची उत्सुकता लागली होती. समाजातील विविध १२ क्षेत्रांमध्ये झोकून काम करत असलेल्या तरूणाईची निवड झी युवा वाहिनीने या पुरस्कारांसाठी केली आहे. २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्याची रंगत अनुभवता येणार आहे. या मंचावर अभिनेत्री प्राजक्ता माळी  झी युवा तेजस्वी चेहरा २०२३ या पुरस्काराने सन्मानित  होणार आहे. समाजातील कर्तृत्ववान तरूणाईच्या कामाचं कौतुक व्हावं, भविष्य उजवल करणाऱ्या तरूणाईचे समाजाने अनुकरण करावे या हेतूने झी युवा वाहिनीने झी युवा सन्मान पुरस्कारांची घोषणा केली आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्यासह माझा व डेरीमिल्क यांचे या सोहळ्याला सहकार्य मिळाले आहे.


जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील नायिका मेघना या सर्वोत्कृष्ट फ्रेश चेहरा इथंपासून सुरू झालेला प्राजक्ता माळी हिचा प्रवास पांडू २ या सिनेमातील  सर्वोत्कृष्ट खलनायिका इथंपर्यंतचा प्रवास थक्कं करणारा आहे. मालिका, नाटक, सिनेमा, वेबसीरीज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे. योगा, शाकाहार, नियमित व्यायाम यातून बहरलेल्या प्राजक्ताच्या नितळ सौदर्याला नेहमीच दाद मिळते. सौंदर्याविषयीच्या तिच्या टिप्स गाजत असतात. प्राजक्तप्रभा हा काव्यसंग्रह आणि प्राजक्तराज हा पारंपरिक दागिन्यांचे व्यवसाय करत प्राजक्ताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी युवा तेजस्वी चेहरा या विभागासाठी झी युवा वाहिनीने प्राजक्ता माळी हिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि तिच्या चाहत्यांच्या आनंदालाही तेज आलं.


 तेजस्वी चेहरा आणि प्राजक्ता माळी हे समीकरण दृढ आहे ते प्राजक्ताने निवडलेल्या राहणीमानामुळेच. त्यामुळे सर्वोत्कृष्ट खलनायिकेपाठोपाठ तेजस्वी चेहरा हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता जास्तच खुश आहे. माझ्या घरातील एक खास कोपरा दिवसेंदिवस भरत चालला आहे अशा शब्दात तिने पुरस्कारांचा आनंद व्यक्त केला आहे.  २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्याची रंगत झी युवा वाहिनीवर तुम्हाला अनुभवता येणार आहे.